Posts

Showing posts from August, 2024

मरण

मरण.... आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही सगळंच जमेल अस काही नाही किंचित थोडं उरेल  पर्याय नाही कोणाच खातं कधी क्लोज होईल सांगता येत नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही मरतात दुसरे आपण नाही.. अजून खूप आहे एवढ्यात जात नाही खुळ्या कल्पनांना इथे अंत नाही इच्छा आणि पूर्ती याचा मेळ बसत नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही माझ्याच बाबतीत हे का? मग पडतो प्रश्न.. सगळं करून झाल्यावर मग आठवतो कृष्ण कृष्ण मिळायला आपण अर्जुन नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही कसलं ज्योतिष कसल भविष्य येणार असेल मरण तर येतेच अवश्य.. टाळू म्हटलं तरी मरण टळत नाही।। आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही मग काय करावे? अंदाजपंचे जगत रहावे एकेका क्षणात  जगून पहावे... एकदा बॉडी झाल्यावर कोण कोणाचे नाही तिरडीवर जळायला सोबतीला कोण नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही.... -प्रशांत.