आठवी ब तला मोर... 😀
आठवी ब तला मोर... 😀 विचारायला हवं होत तिला आता त्याला वाटते.. आता तिला पाहिल्यावर काळजात लुकलूकते.. तेव्हा करत राहिलो अभ्यास खाली मान घालून.. तरी पाहायचो हळूच जर गेली ती समोरून... वह्यांची देवाण घेवाण ते ओझरते स्पर्श... तोंड बंद तरी.. नजरेत होता हर्ष.. ती दिसली की लागायचे थेट काळजात इंडिकेटर लक्ष कुठे तुझे छोट्या बाई मारायच्या अचूक डस्टर शाळा संपली म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दहावीलाच संपली याची लैला मजनूची कहाणी.. दिवस सरले वर्षे गेली आठवण तिची सरेना काही केल्या प्रेमाचा येळकोट याच्या जाईना शांतीसाठी देव आठवला गेला एकदा देवळात.. किती वर्षांनी दिसली ती तिकडे त्याला अकस्मात. देवा समोर बसून ती होती वळीत वाती.. आताही दडपून गेली त्याची उगाच छाती.. तीच आली जवळ, म्हणाली केवढे पडले टक्कल.. अजून तुला वेड्या जराही नाही अक्कल नुसतं बघून वेड्या काही होत नसतं.. प्रेम करायला अंगात धाडस असावं लागतं जा आता वेड्या मी वळत बसते वाती ऐन वेळी खुळ्या तू खातोस मात्र माती... ती गेली डुलत डुलत सावरीत देह पसारा.. याचाही मोर बसला आवरून ...