सुनयना..😊 इतके सुन्दर डोळे तुझे आता त्याचा विमा उतर किती दिवस काठावर आता थेट काळजात उतर.. किती प्रश्न माझ्याकडे तुझ्या डोळ्यात त्याचे उत्तर आत आहे पाझर माझ्या जरी समजतेस मला पत्थर रोखून बघतेस डोळे जेव्हा माझ्याकडे नसते उत्तर.. फुलतो आता सोनचाफा अवघा देह होतो अत्तर.. डोळेच नव्हे सखे तुझे संमोहनाचे जालीम मंतर नकोच आता उपाय काही होऊन जातो आता सरेंडर @ प्रशांत
मरण.... आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही सगळंच जमेल अस काही नाही किंचित थोडं उरेल पर्याय नाही कोणाच खातं कधी क्लोज होईल सांगता येत नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही मरतात दुसरे आपण नाही.. अजून खूप आहे एवढ्यात जात नाही खुळ्या कल्पनांना इथे अंत नाही इच्छा आणि पूर्ती याचा मेळ बसत नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही माझ्याच बाबतीत हे का? मग पडतो प्रश्न.. सगळं करून झाल्यावर मग आठवतो कृष्ण कृष्ण मिळायला आपण अर्जुन नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही कसलं ज्योतिष कसल भविष्य येणार असेल मरण तर येतेच अवश्य.. टाळू म्हटलं तरी मरण टळत नाही।। आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही मग काय करावे? अंदाजपंचे जगत रहावे एकेका क्षणात जगून पहावे... एकदा बॉडी झाल्यावर कोण कोणाचे नाही तिरडीवर जळायला सोबतीला कोण नाही आज आहे उद्या नाही कोणाचाच काही भरवसा नाही.... -प्रशांत.
Comments
Post a Comment